बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 (08:05 IST)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना स्टार प्रचारकांची यादी जाहीर

uddhav thackeray
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट सर्व पक्ष आतुरतेने बघत आहे निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीत एकूण 40 नावे आहेत. या मध्ये शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, संजय राऊत, भास्कर जाधव समाविष्ट आहे. 
ठाकरे उबाठा पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी -
 उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे,सुभाष देसाई,संजय राऊत,अनंत गीते,चंद्रकांत खैरे,अरविंद सावंत,भास्कर जाधव,अनिल देसाईविनायक राऊत,अनिल परब,राजन विचारे,सुनील प्रभू,आदेश बांदेकर,वरुण सरदेसाई,अंबादास दानवे,रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत,राजकुमार बाफना, नितीन बनूगडे पाटील, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय (बंडू) जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, शीतल शेठ–देवरूखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, सुनील शिंदे, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, अशोक तिवारी, प्रियांका जोशी, सचिन साठे, लक्ष्मण वाडले ही नावे आहेत. 
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर2025 रोजी मतमोजणी होणार आहेत.
Edited By - Priya Dixit