गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (09:50 IST)

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय १४ फेब्रुवारीला लागण्याची शक्यता

disqualification of NCP MLA
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. या निकालाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहचली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे याच निर्णयावर अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे. हा निकाल १४ फेब्रुवारी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जो निकाल शिवसनेच्या बाबतीत दिला, तोच निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत दिला आहे. परंतु राहुल नार्वेकर यांचा निकाल शिवसेनेच्या निकालाहून वेगळा निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत लागण्याची शक्यता आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor