गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2023 (08:23 IST)

पिंपरी-चिंचवड :डोक्यावर होर्डिंग कोसळले, ५ जणांचा मृत्यू

Pimpri Chinchwad Hoarding fell on the head 5 people died
पिंपरी-चिंचवडमध्ये  वादळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अडोशाला उभे राहिले अन् डोक्यावर होर्डींग कोसळले. त्यात पाच जणांचा बळी गेला आहे. तर दोन जण जखमी आहेत, ही घटना घडली आहे. बंगळुरू महामार्गावरील रावेतमध्ये. जखमी रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले.  येथे वाहतूक कोंडी झाली होती. या भागातील वीजुपरठा खंडीत झाला आहे.
 
पिंपरी-चिंचवडमधील उपनगरांमध्ये सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान वादळी पावसाने झोडपून काढले.  आज दानादान उडविली. त्यामुळे वाकड आणि किवळे, रावेत मधील झाडे उन्मळून पडली आहेत. पावसामुळे महामार्गावरून प्रवास करणाºयांची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.
 
कोठेझाला अपघात
बंगळुरू-मुंंबई महामार्गावरील पवनानदी सोडल्यानंतर सेवा रस्त्याने जाताना समीर लॉन चौकाच्या अलीकडे एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या प्रकल्पाकडून महामार्गावर येताना रस्त्यावर होर्डींग मागील बाजूस असणाºया एक हॉटेल आणि पंक्चरवाल्याची टपरी आहे. तेथील अडोशाला नागरीक उभे राहिले होते.
 
Edited By - Ratnadeep ranshoor