नागपुरात सुपारी व्यापाऱ्यांच्या गोदामांवर छापे, गुन्हे शाखेची मोठी कारवाई
नागपूरमधील गुन्हे शाखेने सुपारीच्या गोदामांवर मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने सुपारी व्यापाऱ्यांच्या गोदामांवर छापे टाकले आणि माल सील केला.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरात खर्रा आणि पान मसाल्यासाठी कुजलेल्या सुपारीचा वापर होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर, सीपी रवींद्र कुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले. डीसीपी राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी सुपारी व्यापारी आणि वाहतूकदारांच्या गोदामांवर छापे टाकले.
तपासात ४६४ पोती सुपारी आढळून आली, जी पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सील केली आहे. पोलिसांनी सुपारी व्यापारी आणि वाहतूकदाराविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. एनडीपीएस सेलच्या पथकाने गुरुवारी दुपारी लकडगंज येथील स्मॉल फॅक्टरी एरियामध्ये असलेल्या विक्रांत ट्रान्सपोर्टच्या गोदामावर छापा टाकला. ३१५ पांढऱ्या पोत्यांमध्ये कुजलेले सुपारी आढळली.
प्रत्येक पोत्यात ५० किलो सुपारी होती, ज्याची किंमत २०,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
Edited By- Dhanashri Naik