संबंधित माहिती
- पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- नागपुरात पैश्याच्या पाऊसासाठी अल्पवयीन मेहुणीवर ८ महिने बलात्कार
- ‘बीआयएस’चे नागपूरसह “या” ठिकाणी छापे; एक कोटींचे दागिने जप्त
- Bageshwar Dham: धीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांशी संबंधित बागेश्वर धाम वाद काय आहे
- बुलढाण्याजवळ खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; “इतके” जण ठार
नागपूर: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून जंगलात कारमध्ये कोंबून दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना सावनेरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अखिल महाविर भोंगे (२६, रा. पंदराखेडी, ता. सावनेर) आणि पवन विठ्ठलराव बासकवरे (२४, मानेगाव, ता. सावनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी स्विटी(काल्पनिक नाव) ही सावनेरमधील एका विद्यालयात दहावीत शिकते. तिच्या वर्गमैत्रिणीचा आरोपी अखिल भोंगे हा प्रियकर होता. पवन बासकवरे त्याचा मित्र होता. २३ जानेवारीला सायंकाळी पवन आणि अखिल हे दोघेही स्वीटीला शाळेत भेटायला आले. स्विटीला कारमध्ये बसवून पवन आणि अखिलेशने कार नागपूर महामार्गाने घेतली. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
Edited By- Ratnadeep Ranshoor
