संबंधित माहिती
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मनमानी धोरणामुळे लाखो तरूणांच्या स्वप्नाची माती !
- सुप्रिया शिंदेला पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश २३ व्या वर्षी होणार प्रशासकीय अधिकारी
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे 673 पदांची भरती
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
MPSC Combine Exam :MPSC विद्यार्थ्यांचा डेटा लीक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिल रोजी होणार आहे. या पूर्वी विद्यार्थ्यांचा डेटा लीक होण्याची धक्कादायक माहिती समोर आली असून विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचे समोर आले आहे. 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब', 'क'च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक( Exam Hall Ticket Hack) करण्यात आले असून या विद्यार्थ्यांची माहिती मिळत आहे. आता आयोगाने या प्रकरणाच्या संदर्भात सायबर पोलिसांत तक्रार केली आहे.या मध्ये परीक्षा चे पेपर देखील लीक होण्याचा दावा केला जात आहे.
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहेटेलिग्राम ॲपवरील एका चॅनेलवर या परीक्षेला बसणाऱ्या सुमारे 90 हजार उमेदवारांची हॉल तिकिटं लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसंच परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचा दावाही या चॅनेलवर करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर ह्या संदर्भातील पोस्ट व्हायरल होत असून उमेदवारांच्या हॉल तिकीटाची यादी मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 23, 2023
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव म्हणाल्या की, या गोष्टीवर पडताळणी केली जाणार असून पेपर लीक होत नाही. हे सर्व बनावट आणि खोटं आहे. वस्तुस्थितीची पडताळणी करून पेपर कधी होणार हे लवकरच कळेल. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ह्या बाह्यलिंकवर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यीची सुविधा बंद करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या बाह्यलिकंवरील विद्यार्थ्यांची हॉल तिकीट वगळता इतर डेटा लीक झाला नसल्याचं आयोगाने म्हटलं आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्याचंही आयोगाने मान्य केलं आहे.
संबंधित टेलिग्राम चॅनेलकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध नसल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर आयोगाने विद्यार्थ्यांना काही सूचना केल्या आहेत.
आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करून घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेच प्रवेश देण्यात येईल.
प्रवेश प्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अडमिनविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्याची सखोल चौकशी करण्यात येईल असंही आयोगाने म्हटलं आहे.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
Edited By - Priya Dixit
Edited By - Priya Dixit
