1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. MP Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital

खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शरद पवार यांना आज पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मागील महिन्यात प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिले. 
नियमित तपासणीसाठी आणि वैद्यकीय चाचणीसाठी आज त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 
त्या म्हणाल्या, पवार साहेबांना नियमित तपासणी साठी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर काही चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांचा अहवाल आल्यावरच त्यांच्या प्रकृती बाबत अधिक माहिती मिळू शकेल.
ते आज बारामतीत जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.त्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
Edited By - Priya Dixit
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
टिळक-बिंदी वादावर Lenskart ची मोठी पाऊलखूण! इन-स्टोअर स्टाईल गाईडमध्ये बदल; सर्व धार्मिक चिन्हांना अधिकृत परवानगी