महाराष्ट्रात अॅनालॉग पनीरच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी, नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास होणार
महाराष्ट्रामध्ये अॅनालॉग म्हणजे कृत्रिम/दुग्धविरहित पनीरवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय सार्वजनिक आरोग्याचा विचार करून घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव, महाराष्ट्र सरकारने दुग्धविरहित 'अॅनालॉग पनीर'च्या उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक आणि वितरणावर तात्काळ प्रभावाने संपूर्ण बंदी घातली आहे. छत्तीसगडनंतर अशी कठोर कारवाई करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
वनस्पती तेल, स्टार्च आणि इतर दुग्धविरहित घटकांपासून बनवलेले अॅनालॉग पनीर पौष्टिकतेच्या बाबतीत कमी असते आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा विचार करून, महाराष्ट्र सरकारने राज्यात अॅनालॉग पनीर वितरणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. अॅनालॉग चीजचे उत्पादन आणि विक्री केल्यास तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची तरतूदही आहे. सरे राज्य ठरले आहे.
माहितीनुसार हे पनीर बनवण्यासाठी दुधाचा एक थेंबही वापरला जात नाही. त्याऐवजी स्वस्त पाम तेल, स्टार्च, वनस्पती फॅट्स आणि रसायने वापरली जातात, जी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्स अस्सल पनीर सांगून ग्राहकांना हे स्वस्त व बनावट पनीर खाऊ घालत होते. यापूर्वी रेस्टॉरंट्सना मेन्यू कार्डवर 'अॅनालॉग पनीर'चा स्पष्ट उल्लेख करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याचे पालन न झाल्याने थेट बंदीचा निर्णय घेण्यात आला. आता या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल: नियम मोडल्यास ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हे बनावट पनीर खाऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, आजीवन कारावास आणि १० लाख रुपयांपेक्षा जास्त दंडाची तरतूद आहे.अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: कॅन्सर पीडित रुग्णांना आता तिकिटांसाठी धावपळ करण्याची गरज नाही; आपत्कालीन कोट्यातील जागा मिळणार