संबंधित माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर, केदारनाथ धाम पोहोचले, दिलेलं वचन पाळलं
- बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसून,कोरड्या हवामानाची स्थिती
- मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड
- मुलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार, आरोपीला अटक
- राज्यातील सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांचे ९६४ कोटींचे थकित कर्ज होणार माफ,राज्य सरकारचा निर्णय
नवनीत राणा यांच्या अजामीनपात्र वारंटवर कारवाई !
नवनीत राणा या नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात त्यांच्या विरोधात शिवडी महदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वारंट जाहीर केले होते. न्यायालयानं त्या वॉरंट वर कारवाई करण्याचे आदेश दिले. या अजामीनपात्राच्या विरोधात याचिका मुंबई सत्र न्यायालयात नवनीत राणा यांनी दाखल केली असून त्यावर मुंबई सत्र न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याने या अजामीनपात्र वारंटवर कारवाई करण्याचे आदेश शिवडी कोर्टाने पोलिसांना दिले असून नवनीत राणा यांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनवाई 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Edited By- Priya Dixit
पुढील लेख
