1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑगस्ट 2025 (16:01 IST)

गडकरींच्या निवासस्थानी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले

nitin gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी रविवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन आल्याने घबराट पसरली होती.
पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमेश विष्णू राऊत (४०) असे आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे. तो पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नांची योग्य उत्तरे देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईल फोन त्याचा असला तरी तो त्याच्या मित्राने कॉल केल्याचे भासवत आहे.
दरम्यान, त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिस त्याची पुन्हा चौकशी करतील. सोमवारीही गडकरींच्या दोन्ही निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Edited By- Dhanashri Naik