पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 10000 जमा होणार
महाराष्ट्रात सध्या काही जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून शेत, गुरे वाहून गेली आहे तर अनेक ठिकाणी घरे देखील उध्वस्त झाली आहे.
तसेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात नद्यांना आलेल्या महापूरमुळे अनेक गवे प्रभावित झाले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी पत्रकारपरिषद मध्ये सांगितले की, १ ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १०,००० रुपये जमा करण्यात येणार आहे.
तसेच त्यांनी बाधित क्षेत्राची देखील माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारने पूर प्रभावित नागरिकांसाठी तांदूळ आणि गहू पुरवण्याचे आदेश दिले आहे. तसेच हे धान्य वाटप सुरु झाले असून नागरिकांना आर्थिक मदत देखील पुरवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे पुरामुळे प्रभावित झाले आहे.
Edited By- Dhanashri Naik