1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Man dies after garbage dump collapses in Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील मोशी घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कोसळल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. दोन मजली इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर काल रात्री उशिरापर्यंत आठ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.
मृत व्यक्तीची ओळख भावेश वाणी अशी पटली आहे. गेल्या २४ तासांपासून युद्धपातळीवरील मदत आणि बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाने १४ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, मोशी कचरा डेपोमध्ये अनेक वर्षांपासून शहराचा घनकचरा साचल्यामुळे कचऱ्याचा एक प्रचंड डोंगर तयार झाला होता. त्याच परिसरात कचऱ्यापासून वीज बनवणाऱ्या कंपनीची दोन मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात आली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा एक मोठा ढिगारा घसरून थेट इमारतीवर पडला, ज्यामुळे काही क्षणांतच संपूर्ण इमारत कोसळली.ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना कोणतीही इजा न पोहोचवता बाहेर काढणे हे बचाव पथकापुढील मोठे आव्हान आहे.
Edited By- Dhanashri Naik