1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Five people died suspiciously on the same day in Dapodi

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

पुणे बातम्या
पुण्यामध्ये दापोडी येथे आज म्हणजेच गुरुवारी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अफवा आणि चर्चांना वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाचही मृत्यू वेगळे असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्यात थेट संबंध आढळला नाही. काही लोकांनी दारू पिऊन किंवा दारूच्या विषबाधेमुळे  मृत्यू झाल्याची चर्चा केली. स्थानिकांनुसार, काहीजण एकत्र दारू पित असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत दोन शवविच्छेदन अहवालात दारूचे अंश आढळले नाहीत. 
पोलिसांनी परिसरात अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे. पूर्ण शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर अधिक स्पष्टता येईल. ही घटना दुर्दैवी आहे.  
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू