पुण्यातील डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसला आग
पुण्यातील शिवाजीनगर येथील नरवीर तानाजी वाडी येथील डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका बसला आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
शिवाजीनगर येथे नरवीर वाडी येथे गुरुवारी पहाटे 5:30 च्या सुमारास पीएमपीएमएल बसने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळतातच कसबा अग्निशमनदलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली. तो पर्यंत बसने चांगलाच पेट घेतला असून काच बाकडे, वायरिंग जाळून खाक झाले.
अग्निशमन दलाने 15 ते 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.