पुण्यातील नाना पेठेत विजेच्या धक्क्याने 7 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  पुणे शहरातील नाना पेठेत डोके तालीम परिसरात रविवारी दुपारी विजेचा धक्का लागून 7 वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायली गणेश डंबे असे या मुलीचे नाव आहे. तर तिच्या सोबत खेळणारा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहे. सदर अपघात रविवारी दुपारी नानापेठेतील डोके तालीम जवळ घडली. 
				  													
						
																							
									  				  				  
	मृत सायली आणि तिचा मित्र रुद्र हे दोघे रस्त्यावर खेळत होते. खेळत असताना सायलीचा हात रस्त्यावरून गेलेल्या उघड्या वायरला लागला. अचानक तिला विजेचा धक्का लागला आणि ती जागीच बेशुद्ध झाली. तसेच तिच्या सोबत असलेल्या रुद्रला देखील विजेचा धक्का लागला आणि तो गंभीर जखमी झाला. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	दोघांना परिसरातील नागरिकांनी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी सायलीला मृत घोषित केले. तर रुद्रावर उपचार सुरु असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती मिळाली आहे. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु केला आहे
				  																								
											
									  				  																	
									  
	या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांनी महावितरण विभागाच्या निष्काळजीपणावर नाराजगी व्यक्त केली आहे. रस्त्यावर उघड्या केबल्स ठेवल्याने दोन चिमुकलांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागल्याचे नागरिक म्हणत आहे. 
				  																	
									  				  																	
									  
	महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप लेकराला जीव द्यावा लागला  आणि दुसऱ्याचे आयुष्य अंधारात गेले.महावितरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे 
				  																	
									  
	Edited By - Priya Dixit