शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. फिलिपाईन्स डायरी
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2022 (22:28 IST)

नेपाळचे पोखरा पाहण्यासाठी खूप सुंदर आहे, जाणून घ्या येथील अद्भुत ठिकाण

Pokhara of Nepal is very beautiful to see
नेपाळ आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. चहुबाजूंनी निसर्गाने वेढलेले नेपाळ पाहण्यासारखे आहे. येथील लोक हिंदू संस्कृतीचे पालन करतात. नेपाळमध्ये पाहण्यासारखे भरपूर असले तरी नेपाळ मधील पोखरा पर्यटकांना खूप आवडतो . चला तर मग पोखरातील फिरण्यासारख्या ठिकाणांविषयी जाणून घेऊ या.
 
1) रुपाचा तलाव-पोखरा खोऱ्याच्या आग्नेय दिशेला असलेला हा तलाव पोखरा खोऱ्यातील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. हे सुंदर तलाव नेपाळमधील एकमेव गोड्या पाण्याचे सरोवर मानले जाते. येथे बोटिंगचा आनंदही घेऊ शकता.
 
2) ताल.बाराही मंदिर - हे तलावाचे मंदिर आहे आणि दुर्गा देवीला समर्पित आहे. असे म्हणतात की 18 व्या शतकात बांधलेले हे मंदिर चारही बाजूंनी तलावांनी वेढलेले आहे, जे पाहण्यास अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते.  
 
3) बेगनास तलाव-ऋतूनुसार रंग बदलणारा हा तलाव पोखरा खोऱ्यातील आठ तलावांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा तलाव आहे. या तलावावर आपण जोडीदारासोबत वेळ घालवू शकता. या तलावात नौकाविहार, मासेमारी अशा गोष्टींचा आनंद देखील सहज घेऊ शकता.
 
4) गुप्तेश्वर महादेव गुहा- हे प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ म्हणजे गुहा मंदिर. जे भगवान शिवाला समर्पित आहे. येथे फोटो काढण्याची परवानगी नाही.
 
5) सारंगकोट- निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी भेट देऊ शकता. हे ठिकाण पोखराच्या सीमेवर आहे. येथील निसर्गसौंदर्य हे ठिकाण आणखीनच सुंदर बनवते.