Shardiya Navratri 2025 शारदीय नवरात्र घटस्थापना मुहूर्त
Shardiya Navratri 2025: दरवर्षी आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदापासून शारदीय नवरात्र आरंभ होत.या दिवशी घटस्थापना केली जाते. देवीच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रात केली जाते. यंदा शारदीय नवरात्र सण 22 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर पर्यंत असेल. तर जाणून घेऊया घटस्थापना शुभ मुहूर्त-
शुभ मुहूर्त पहाटे 4:32 ते 6:07 च्या दरम्यान.
अभिजित मुहूर्त: सकाळी 11:46 ते दुपारी 12:34 पर्यंत.
अमृत मुहूर्त: सकाळी 6:07 ते 7:38 पर्यंत.
शुभ मुहूर्त: सकाळी 9:08 ते 10:39 पर्यंत.
लाभ मुहूर्त : दुपारी 3:12 ते 4:43पर्यंत.
अमृत मुहूर्त: दुपारी 4:43 ते 6:13 पर्यंत.
विजय मुहूर्त: दुपारी 2:15 ते 3:03 पर्यंत.
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 6:13 ते 6:37 पर्यंत.
निशीथ काल पूजा मुहूर्त: मध्यरात्री 11:46 ते 12:33 पर्यंत.
शुभ योग: श्रीवत्स, शुक्ल योग आणि ब्रह्मयोगात उत्तराफाल्गुनी नंतर हस्त नक्षत्र राहील.
सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 6.19 पर्यंत राहील.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून देवी आईची प्रतिष्ठापना केली जाते. घटस्थापना शुभ मुहूर्तावर विधी विधानाने करावी. कलशाची स्थापना मंदिराच्या उत्तर-पूर्व दिशेला करावी.
चौरंग ठेऊन कलशाची स्थापना करावी.नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रुपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते. यामध्ये शैलपुत्री देवी, ब्रह्मचारिणी देवी, चंद्रघंटा देवी, कुष्मांडा देवी, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, कालरात्री देवी, देवी महागौरी, देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते. या वर्षी देवीआई हत्तीवर स्वार होऊन येत आहे. हे शुभ मानले जाते. मानवी जीवनावर याचा सकारात्मक आणि शुभ परिणाम होतो.
Edited By - Priya Dixit