1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Mother was killed for not getting married

Telangana News लग्न होत नसल्याने आईची हत्या

murder
Telangana News : तेलंगणातील बांदा जिल्ह्यातील मेलाराम गावात बुधवारी मध्यरात्री मुलाने आईची हत्या केली आहे. ही महिला तिच्या मुलासोबत राहत होती. या प्रकरणात पोलिसांनी मुलासह आणखी एका नातेवाईकाला अटक केली आहे. महिलेच्या मुलीच्या आरोपांनंतर तक्रार दाखल करत पोलिसांनी तपासादरम्यान मुलाला व एका नातेवाईकाला ताब्यात घेतलं होतं. त्यांनी गुन्हादेखील कबुल केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आईच्या डोक्यात वीट घालून हत्या केली आहे. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून तिचा गळा चिरला आहे. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी नंतर त्याने खोटी कहाणी रचली. चोरीच्या कारणाने हत्या झाल्याचा खोटा बनाव त्याने रचला होता. ईश्वर असं आरोपीचे नाव असून त्याचे वय अवघे 21 वर्ष आहे. 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, ईश्वर हा दिव्यांग होता. त्याला लग्न करायचे होते. त्यामुळं लग्नासाठी नवरी शोधण्यासाठी त्यांने आईवर दबाव टाकला होता. दिव्यांग आणि बेरोजगार असल्याने त्याला लग्नासाठी मुली मिळत नव्हत्या. त्यामुळं त्याची चिडचिड होत होती. आई लग्नासाठी मुलगी शोधू शकत नाही यामुळं तो आईवर नाराज होता. त्यामुळं त्याने आईचीच हत्या करण्याचा कट रचला. आणखी एका साथीदाराच्या मदतीने त्यांने आईलाच निर्घृणपणे संपवले.
पुढील लेख
जगभरात ‘या’ कारणामुळे वाढतोय एकाच मुलाचा ट्रेंड