'अर्नब' चक्रीवादळामुळे हाय अलर्ट! ६४ गाड्या रद्द; अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
'अर्नब' चक्रीवादळ २८ ऑक्टोबरच्या सकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३५ किमी पर्यंतच्या वाऱ्याचा आणि अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ६४ गाड्या आणि अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अर्नब' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ २८ ऑक्टोबरच्या सकाळी आंध्र प्रदेश आणि यानम या केंद्रशासित प्रदेशाच्या किनारपट्टीजवळ, बापटला आणि विशाखापट्टणम दरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किमी पर्यंत पोहोचू शकतो, तर वाऱ्याचे झोत ताशी १५० किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता चक्रीवादळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात १६.२ अंश उत्तर अक्षांश आणि ८३.७ अंश पूर्व रेखांशावर होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ २७ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आणि त्यानंतर वायव्य दिशेकडे वळले. २८ ऑक्टोबरच्या सकाळी ते अति तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. वादळामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
२८ ऑक्टोबर रोजी ओडिशामध्ये सर्वत्र पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाने २८ ऑक्टोबर रोजी ओडिशा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानममध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. २८ ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमध्येही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी अपेक्षित आहे.
५ राज्ये आणि यानममध्ये एनडीआरएफची ३१ पथके तैनात
शाहिदी यांच्या म्हणण्यानुसार, ५ राज्ये आणि यानममध्ये एनडीआरएफची ३१ पथके तैनात करण्यात आली आहे. यामध्ये आंध्र प्रदेशात १२, ओडिशामध्ये ९, छत्तीसगडमध्ये ४, तेलंगणामध्ये ३ आणि यानममध्ये २ पथकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ओडिशामध्ये ओडीआरएएफची ६० पथके आणि आंध्र प्रदेशसह इतर प्रभावित भागांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची सुमारे ११ पथके तैनात करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरातील सक्रिय चक्रीवादळाची तीव्रता २७ ऑक्टोबर रोजी पहाटे २:३० वाजता अति तीव्र चक्रीवादळात बदलली आहे. त्यांनी मच्छिमारांना ३० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
चक्रीवादळाच्या धोक्यामुळे, कृष्णा जिल्ह्यातील गन्नवरम विमानतळावरून उड्डाण करणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहे. यामध्ये इंडिगोच्या कडप्पा, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळूरुला जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. एअर इंडिया एक्सप्रेसची विशाखापट्टणमला जाणारी सेवा देखील रद्द करण्यात आली आहे.
चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून ५३ लोकल आणि ११ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहे.
