1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Hafiz Saeed arrested from Lahore

मोस्ट वांटेड हाफिज सईदला अटक

Most wanted terrorist
लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिझला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मोस्ट वांटेड हाफिझ सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली. 
 
पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिझ सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. हाफिझने अनेक जागी दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. टेरर फंडिग केसमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भारताला मोठा यश मिळाले आहे.
पुढील लेख
केन विल्यमसन: वर्ल्ड कप 2019 गमावूनही जग जिंकणारा न्यूझीलंडचा कर्णधार