संबंधित माहिती
- माकडाने २ लाख रुपये असलेली बॅग चोरली, झाडावर बसून झाडावरून नोटांचा पाऊस पाडला
- सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूची गोळ्या झाडून हत्या
- कोल्हापूरच्या पन्हाळा येथे लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे महिलेची हत्या
- कोल्हापूरमध्ये घरात घुसून महिला डॉक्टरवर ओळखीच्या व्यक्ती कडून बलात्कार
- कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक लैंगिक घोटाळा उघडकीस आला
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात गुगल मॅपच्या नादात कुटुंब कोसळलं नाल्यात
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात घडली, जिथे गूगल मॅप्सचा मार्ग वापरताना एका कुटुंबाचा अपघात झाला. दादरीहून मेरठच्या किथोर येथील एका लग्नाला जाण्यासाठी निघालेल्या या कुटुंबाने गूगल मॅप्सवर विश्वास ठेवून चुकीचा मार्ग निवडला आणि त्यांची गाडी एका खोल नाल्यात पडली.
हापूर शहरातील शामनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. गाडीत मुलांसह एकाच कुटुंबातील चार सदस्य होते. गाडी तुडुंब भरलेल्या नाल्यात अडकल्यानंतर तिचे दरवाजे बंद झाले आणि कुटुंब आत अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जवळपास दोन तास चाललेल्या आव्हानात्मक बचाव कार्यानंतर, पथकाने गाडीच्या काचा फोडून क्रेनच्या मदतीने सर्व सदस्यांना सुखरूप बाहेर काढले.
गाडी चालवत असलेल्या चालकाने सांगितले की, ते गुगल मॅप्सचे काटेकोरपणे पालन करत होते. रस्त्यावर पाणी साचले होते, पण नकाशावर मार्ग मोकळा दिसत असल्याने गाडी पुढे जाऊ शकेल असे त्याला वाटले. मात्र, गाडी पुढे सरकल्यावर ती थेट नाल्यात जाऊन पडली. सुदैवाने, मदत वेळेवर पोहोचली, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
Edited By- Dhanashri Naik