मंगळवार, 16 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑगस्ट 2025 (12:15 IST)

जम्मूच्या राजगड तालुक्यात ढगफुटी, चार जणांचा मृत्यू

Ramban cloudburst
जम्मूच्या राजगड तालुक्यात ढगफुटी, चार जणांचा मृत्यू झाला.तर एक जण बेपत्ता झाला.बचाव पथके बाधित भागात रवाना झाले आहे. बेपत्ता लोकांचा शोध लावत आहे. आता पर्यंत चार मृतदेह सापडले आहे. 
अचानक आलेल्या ढगफुटीमुळे पूर आला, ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितांच्या कुटुंबियांना तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. 
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटरवर पोस्ट केले, "रामबनचे डीसी मोहम्मद अलियास खान यांच्याशी आत्ताच बोललो. राजगड परिसरात ढगफुटीमुळे दुर्दैवाने चार जणांचा मृत्यू झाला आहे. पाचवा व्यक्ती बेपत्ता आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, कोणीही जखमी झालेले नाही. बचाव कार्य सुरू आहे. सर्व शक्य ती मदत पुरवली जात आहे. मी सतत संपर्कात आहे.
मंगळवारी जम्मू भागात मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरानंतर गेल्या पाच दिवसांपासून रेल्वे सेवा थांबविण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कठुआ आणि उधमपूर दरम्यानचा ट्रॅक अनेक ठिकाणी घसरला आहे आणि तुटला आहे, ज्यामुळे रेल्वे वाहतूक बंद आहे. यामुळे मोठ्या संख्येने गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत."
Edited By - Priya Dixit