देवदर्शनासाठी जाणारी जीप दरीत कोसळली, 9 भाविकांचा जागीच मृत्यू  
					
										
                                       
                  
                  				  उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात एक भयंकर अपघात झाला ज्यात 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	या अपघातात मुनसियारीच्या होकरा भागात भाविकांनी भरलेली जीप खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. सध्या बचावकार्यासाठी टीम घटनास्थळी पोहोचली आहे. 
				  				  
	 
	मिळालेल्या माहितीनुसार बागेश्वरच्या शामा येथून सर्व भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी येत असताना कार अनियंत्रित होऊन खड्ड्यात पडली. माहिती मिळताच बचावकार्यासाठी एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. मृतांचा आकडाही वाढण्याची भीती आहे.