लज्जास्पद! मुंबईत एका व्यक्तीने मांजरीला १२व्या मजल्यावरून धक्का देत खाली फेकले
मुंबईतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडिओमध्ये एका मांजराला १२व्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत अंधाऱ्या रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आता ती व्हायरल झाली आहे. ही घटना मुंबईतील अंबरनाथ येथे घडली आहे.
व्हिडिओमध्ये एक माणूस एका कॉरिडॉरमधून सहजपणे चालताना दिसत आहे. त्यानंतर तो बाल्कनीसारख्या ठिकाणी पोहोचतो. अगदी कडेला एक मांजर बसलेले दिसत आहे. पुढे काय होणार आहे याची मांजराला काहीच कल्पना नव्हती. मांजर त्या माणसाकडे पाहते. पण मग तो माणूस तिला ढकलतो. मांजर १२व्या मजल्यावरून खाली पडते. एक मोठा आवाज ऐकू येतो. त्यानंतर, जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात तो माणूस निघून जातो. माणुसकीला काळिमा फासणारी अशी काही माणसे समाजात वावरतात यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.अंबरनाथ की रॉयल फ्लोरा फेज टू हाउसिंग सोसाइटी में एक हैरान कर देने वाला मामला सामने आया है।
— Webdunia Hindi (@WebduniaHindi) July 28, 2026
CCTV फुटेज में कथित तौर पर एक बुजुर्ग व्यक्ति को 12वीं मंजिल के कॉमन एरिया में बैठी बिल्ली को नीचे धकेलते हुए देखा गया।#cat #building #Trending #trendingnow #trendingreels pic.twitter.com/EnuIXXdQb0
Edited By- Dhanashri Naik
