धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली, फोन करून म्हटले - लावला आहे टाईम बॉम्ब
social media
फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर कॉलरने कॉल डिस्कनेक्ट केला. फोन आल्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. या फोन कॉलनंतर लगेचच शाळा प्रशासनाने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.
शाळेच्या तक्रारीच्या आधारे, बीकेसी पोलिस ठाण्यात अज्ञात कॉलरविरुद्ध भादंवि कलम 505 (1) (ब) आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी फोन करणार्याचा शोध घेतला असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला धमकीचा कॉल आला होता ज्यादरम्यान अज्ञात कॉलरने हॉस्पिटल उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती.
Edited by : Smita Joshi
Edited by : Smita Joshi
