1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Sunday Special Recipe Paneer Patties

रविवार स्पेशल बनवा कुरकुरीत आणि आतून मसालेदार 'पनीर पॅटीस'

रविवार आला की, काहीतरी खास मेनू बनवावा असा प्रत्येकाला वाटते, मग या रविवारी बनवा, जे रेस्टॉरंटसारखे बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून मसालेदार, मऊ 'पनीर पॅटीस' घरामध्ये बनवणे अगदी सोपे आहे. घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट पनीर पॅटीस कसे बनवायचे, याची सोपी आणि चविष्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. 
 
क्रिस्पी पनीर पॅटीस 
साहित्य-
१. पॅटीसच्या कोटिंग/बॅइंडिंगसाठी:
उकडलेले बटाटे: ३ मोठे (मॅश केलेले)
कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेडक्रम्स: ३ मोठे चमचे (बाइंडिंगसाठी)
चाट मसाला: १/२ छोटा चमचा
मीठ: चवीनुसार
२. चविष्ट पनीर सारणासाठी:
पनीर: १.५ कप (बारीक किसलेले किंवा बारीक तुकडे केलेले)
कांदा: १ लहान (बारीक चिरलेला)
शिमला मिरची: २-३ चमचे (बारीक चिरलेली)
हिरवी मिरची: १ ते २ (बारीक चिरलेली)
आले-लसूण पेस्ट: १ छोटा चमचा
मसाले: १/२ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा लाल तिखट, १/२ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा आमचूर पावडर/चाट मसाला.
मीठ व कोथिंबीर: चवीनुसार
तेल: १ मोठा चमचा
 
३. पॅटीस कोट करण्यासाठी:
मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरची पेस्ट: २ चमचे मैदा + ३ चमचे पाणी (पातळ घट्टसर पेस्ट)
ब्रेडक्रम्स (Breadcrumbs): १ कप (कुरकुरीतपणासाठी)
तेल: पॅटीस शेकण्यासाठी किंवा तळण्यासाठी
 
कृती-
बटाट्याचे बाहेरील आवरण तयार करणे
एका भांड्यात उकडलेले मॅश केलेले बटाटे, कॉर्नफ्लॉवर (किंवा ब्रेडक्रम्स), चाट मसाला आणि मीठ एकत्र करून मऊ गोळा मळून घ्या.
 
पनीरचे सारण बनवणे
कढईत १ मोठा चमचा तेल गरम करा. त्यात कांदा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट २ मिनिटे परता. त्यात शिमला मिरची आणि सर्व सुके मसाले (हळद, तिखट, गरम मसाला, आमचूर, मीठ) घालून चांगले मिक्स करा. आता किसलेले पनीर आणि कोथिंबीर घालून मंद आचेवर १ ते २ मिनिटे परतून गॅस बंद करा. सारण थंड होऊ द्या.
 
पॅटीस वळणे
हाताला थोडे तेल लावा. बटाट्याच्या मिश्रणाचा मध्यम गोळा घेऊन तो हातावर चपटा (पूरीसारखा) पसरवा. त्याच्या मध्यभागी १ ते २ चमचे तयार पनीरचे सारण ठेवा. चारी बाजूंनी बटाट्याचे आवरण वर आणून बंद करा आणि त्याला गोल किंवा टिकिया/पॅटीसचा छान आकार द्या.
 
कोटिंग आणि तळणे
तयार पॅटीस आधी मॅद्याच्या गोल/पेस्टमध्ये बुडवा आणि नंतर ब्रेडक्रम्समध्ये सर्व बाजूने नीट लोळवून घ्या. (यामुळे पॅटीस खूप क्रिस्पी होतात). तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडे तेल घालून मंद ते मध्यम आचेवर पॅटीस शैलो फ्राय करा. दोन्ही बाजूने छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम क्रिस्पी पनीर पॅटीस टोमॅटो केचप किंवा हिरव्या पुदिना-कोथिंबिरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
बेसनाचा किंवा रव्याचा ढोकळा नेहमीच खातो; ट्राय करा 'मटार ढोकळा' चवीला अतिशय अप्रतिम