तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा पाककृती
साहित्य-
तांदळाचे पीठ - एक वाटी
मीठ - चवीनुसार
पाणी - गरजेनुसार
कांदा - एक बारीक चिरलेला
टोमॅटो - एक बारीक चिरलेला
हिरवी मिरची बारीक चिरलेली
कोथिंबीर
तेल किंवा तूप
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात तांदळाचे पीठ, उडीद डाळीचे पीठ (वापरत असल्यास) आणि मीठ घाला.हळूहळू पाणी टाकून मध्यम घट्ट पिठ तयार करा. पिठ जास्त पातळ किंवा जाड नसावे, डोश्याच्या पिठासारखे असावे.पिठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. आता चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करा. (टॉपिंग तुमच्या आवडीनुसार बदलू शकता, उदा. गाजर, शिमला मिरची इ.) तसेच नॉन-स्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा. थोडे तेल पसरवून तवा पुसून घ्या. आता एक मोठा चमचा पिठ तव्यावर ओता आणि गोलाकार पसरवा . पिठावर चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर पसरवा. हलके दाबा जेणेकरून ते पिठाला चिकटेल.
वरून थोडे तेल किंवा तूप टाका. मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजू द्या, खालचा भाग सोनेरी होईपर्यंत. काळजीपूर्वक उलटवा आणि दुसरी बाजू १-२ मिनिटे शिजवा.
गरम उत्तप्पा नारळाच्या चटणी, सांबार सोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik