1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Quick and easy paneer recipes for guests

घरात बारसं आहे का? पाहुण्यांसाठी पनीरच्या झटपट साध्या सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

पनीरच्या झटपट साध्या सोप्या रेसिपी
बाळाचं 'बारसं' हा महाराष्ट्रातील एक अत्यंत आनंदाचा आणि पारंपरिक सोहळा असतो. या दिवशी पाहुण्यांसाठी जेवणाचे बेत आखताना चविष्ट जेवण असावेत याकडे लक्ष दिले जाते. तसेच घरात कार्यक्रम असला की, खूप धावपळ असते तसेच सर्वात महत्वाचे काम म्हणजे स्वयंपाक काय बनवावा? हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडतो. अश्यावेळेस काय करावे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पनीर हा शाकाहारी जेवणातील असा पदार्थ आहे जो चविष्ट असण्यासोबतच प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. तसेच पनीर सर्वांना आवडते. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर तुम्ही खालीलपैकी एक 'झटपट' रेसिपी नक्की ट्राय करू शकता.

झटपट पनीर भुर्जी
ही सर्वात सोपी आणि सर्वांची आवडती रेसिपी आहे.
साहित्य- २०० ग्रॅम किसलेले किंवा कुस्करलेले पनीर, १ मोठा कांदा, १ टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर.

कृती-
कढईत तेल गरम करून त्यात जिरे, चिरलेला कांदा आणि मिरची परतून घ्या.
कांदा गुलाबी झाला की आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
आता हळद, तिखट, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाका.
सर्वात शेवटी पनीर घालून २-३ मिनिटे परता. वरून भरपूर कोथिंबीर टाकून गरमागरम चपाती किंवा पावासोबत सर्व्ह करा.

पनीर तवा मसाला (ड्राय)
अचानक पाहुणे आले तर ही रेसिपी उत्तम आहे.
साहित्य-पनीरचे चौकोनी तुकडे, शिमला मिरची (Capsicum), कांदा, दही, धणे-जिरे पूड, तिखट आणि कसुरी मेथी.

कृती-
एका बाउलमध्ये २ चमचे दही, तिखट, मीठ आणि धणे-जिरे पूड एकत्र करून त्यात पनीरचे तुकडे मॅरिनेट करा (५ मिनिटे).
तव्यावर थोडे तेल/लोणी टाकून मोठे चिरलेले कांदे आणि शिमला मिरची परतून घ्या.
त्यात मॅरिनेट केलेले पनीर टाका आणि मोठ्या आचेवर ५-७ मिनिटे टॉस करा.
वरू कसुरी मेथी चोळून टाका. तुमचा हॉटेल स्टाईल स्टार्टर तयार!

सोपी पनीर मसाला ग्रेव्ही
घरात वाटण तयार नसेल तरीही ही भाजी छान होते.
साहित्य-पनीर, कांदा-टोमॅटो प्युरी (मिक्सरला लावलेली), क्रीम किंवा दुधाची साय, लाल तिखट आणि पनीर मसाला.

कृती-
कढईत तेल गरम करून कांदा-टोमॅटोची प्युरी चांगली तेल सुटेपर्यंत परता.
त्यात तिखट, हळद आणि पनीर मसाला घाला.
थोडे गरम पाणी घालून ग्रेव्ही उकळू द्या.
आता पनीरचे तुकडे आणि २ चमचे फेटलेली साय (मलाई) घाला.
२ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढा.
खास टिप्स-
मऊ पनीर: पनीर जर कडक वाटत असेल, तर वापरण्यापूर्वी ५ मिनिटे कोमट पाण्यात ठेवा, ते एकदम कापसासारखे मऊ होईल.
तळणे टाळा: झटपट रेसिपीमध्ये पनीर न तळता वापरल्यास ते जास्त ज्यूसी लागते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
World Kidney Day 2026 तुमची किडनी सुरक्षित आहे का? जाणून घ्या ४ महत्त्वाची लक्षणे