1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. Watermelon Burfi Recipe

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Watermelon Burfi
उन्हाळ्याच्या दिवसांत काहीतरी थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी (Watermelon Burfi) हा एक उत्तम आणि हटके पर्याय आहे. टरबूज बनवलेली ही बर्फी दिसायला जितकी आकर्षक असते, तितकीच ती चवीलाही अप्रतिम लागते. चला तर मग जाणून घेऊया सोपी आणि झटपट होणारी टरबूज बर्फी रेसिपी..
साहित्य-
टरबूजचा गर
३ कप मिल्क पावडर
१ कप साखर
१/२ कप तूप
कॉर्नफ्लोअर - २ टीस्पून, २ टेबलस्पून सुके खोबरे
१/२ कप वेलची पूड
१/२ टीस्पून बारीक चिरलेला सुका मेवा
२ टेबलस्पून लाल किंवा गुलाबी खाद्यरंग
 
कृती- 
सर्वात आधी टरबूज धुवून त्याची साल काढा. ते कापून त्याचा गर काढा. नंतर टरबूजचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. तंतू वेगळे करण्यासाठी ते चाळून घ्या.
रसामध्ये कॉर्नफ्लोअर घालून चांगले फेटून घ्या. गॅस चालू करा, एका पातेल्यात तूप घालून गरम होऊ द्या.
आता टरबूजचा गर घालून मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात मिल्क पावडर किंवा मावा घालून मिसळा. गरज वाटल्यास तुम्ही खाद्यरंगही घालू शकता. मिश्रण पातेल्याच्या कडा सोडू लागेपर्यंत शिजवा. शेवटी, वेलची पूड आणि थोडे तूप घाला. एका ताटाला किंवा ट्रेला तुपाने ग्रीस करा. तयार केलेले मिश्रण ट्रेवर पसरवा आणि त्यावर कापलेले पिस्ते व बदाम शिंपडा. नंतर ते २-३ तासांसाठी फ्रिजमध्ये सेट होऊ द्या. फ्रिजमधून बाहेर काढल्यावर, चाकूने बर्फीच्या आकारात कापून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा