चविष्ट अंजीर मोदक गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
अंजीर मोदक पाककृतीअंजीर मोदक ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक मिठाई आहे, जी विशेषतः गणेश चतुर्थीला बनवली जाते.
साहित्य-
अंजीर -एक वाटी
खवा - एक वाटी
साखर -अर्धी वाटी
दूध - दोन चमचे
तूप - दोन चमचे
वेलची पावडर -अर्धा चमचा
काजू/बदाम -दोन चमचे
नारळाचा खवण - १/४ वाटी
पाणी
कृती-
सर्वात आधी अंजीर मऊ असतील तर त्यांना बारीक चिरून ठेवा. जर कडक असतील, तर 15-20 मिनिटे कोमट पाण्यात भिजवा, नंतर पाणी काढून मिक्सरमधून पेस्ट बनवा. आता एका नॉन-स्टिक पॅनमध्येएक चमचा तूप गरम करा. त्यात खवा घालून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतून घ्या, जोपर्यंत खवा हलका सोनेरी होत नाही आणि सुगंध येत नाही. परतलेला खवा बाजूला ठेवा. आता त्याच पॅनमध्ये उरलेले एक चमचा तूप गरम करा. त्यात पेस्ट केलेली अंजीर घाला. मध्यम आचेवर काही मिनिटे परतून घ्या. जर अंजीर पेस्ट खूप कोरडी वाटली, तर दूध किंवा पाणी घाला. अंजीर मऊ आणि चिकट झाले की त्यात साखर किंवा गूळ घाला. साखर वितळेपर्यंत आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत परतत राहा. आता परतलेला खवा अंजीरच्या मिश्रणात घाला. वेलची पावडर आणि बारीक चिरलेले काजू/बदाम घालून सर्व नीट एकत्र करा. मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर पाच मिनिटे शिजवा. मिश्रण मोदकाच्या आकारासाठी योग्य घट्टपणा येण्यासाठी थोडे थंड होऊ द्या. आता मिश्रण हाताळण्याइतपत थंड झाल्यावर त्याचे लहान गोळे बनवा. मोदकाच्या साच्यात मिश्रण घालून त्याला मोदकाचा आकार द्या. जर साचा नसेल, तर हाताने पारंपरिक मोदकाचा आकार देऊ शकता. सजावटीसाठी वरून काजू किंवा बदामाचे तुकडे लावा. अंजीर मोदक थंड झाल्यावर गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik