संबंधित माहिती
- फादर्स डे 2026: वडिलांना काय गिफ्ट द्याल? 10 बजेट-फ्रेंडली कल्पना
- Father's day 2026 wishes from son in law in Marathi 2026 जावयाकडून सासऱ्यांसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा
- मँगो गुलाब जामुन; नाविन्यपूर्ण आणि तोंडाला पाणी आणणारी रेसिपी
- Mango Malpua Recipe मालपुआला द्या आंब्याचा ट्विस्ट; एक अप्रतिम चव
- रसाळ जिलेबी खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का?
फादर्स डे निमित्त वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक मिठाई रेसिपी
फादर्स डे निमित्त वडिलांना गोड सरप्राईज देण्यासाठी पारंपरिक मराठी मिठाईपेक्षा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नाही. तुमच्या वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक सुगंधी केशर श्रीखंड रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
सुगंधी केशर श्रीखंड रेसिपी
साहित्य-
१ किलो ताजे घट्ट दही
३/४ कप पिठीसाखर (किंवा आवडीनुसार)
१०-१२ केशर काड्या (२ चमचे कोमट दुधात भिजवलेल्या)
१ चमचा वेलची पूड
बदाम-पिस्त्याचे काप
ALSO READ: अगदी मिठाईसारखे कलाकंद, लिहून घ्या रेसिपी
कृती-
चक्का बनवणे: दही एका सुती (कॉटन) कपड्यात बांधून ३-४ तास टांगून ठेवा, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल आणि घट्ट 'चक्का' तयार होईल.
मिश्रण तयार करणे: या चक्क्यामध्ये पिठीसाखर घालून मिश्रण चमच्याने किंवा पुरणयंत्रातून छान एकजीव (स्मूथ) करून घ्या.
फ्लेव्हर देणे: आता यात केशरमिश्रित दूध, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्सचे काप घालून मिक्स करा.
सर्व्हिंग: श्रीखंड २ तास फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा आणि नंतर खायला द्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
