1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. Sundar Te Dhyan Lyrics in Marathi

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
 
तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
 
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
 
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
 
अभंग - संत तुकाराम महाराज
गायिका -मा. लता मंगेशकर
संगीत - अनिल - अरुण
पुढील लेख
आपल्या पार्टनरची प्रशंसा करताना फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा