सण आला हा संक्रांतीचा कविता
आदित्याच्या मकरात 'प्रवेशाचा
आनंदे तिळगुळ देण्याघण्याचा
प्रेमाने गोड गोड बोलण्याचा
हळदीच्या निखळ सौंदर्याचा
सौभाग्याच्या मंगळ कुंकवाचा
पतंग दोरी सारख्या नात्याचा
हलव्याच्या दागिन्यांनी नटण्याचा।
स्नेहाने मिळून साजरा करायचा
सौभाग्याची वाणं लुटवायचा
चला सगळेजण मिळून सण
साजरा करूया संक्रांतिचा
सौ. सारिका सोनगाँवकर