बुधवार, 25 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 (09:01 IST)

Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा

Marathi Bhasha Gaurav Din 2026 Wishes in Marathi
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... 
मराठी भाषा गौरव दिनाच्या 
सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!"
 
"माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, 
हिच्या संगाने लाभे आम्हास अमृताचा जिव्हाळा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
 
"मराठी अस्मिता, मराठी संस्कृती,
मराठी मनांची मराठी प्रवृत्ती!
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!"
 
"मराठी ही केवळ भाषा नाही, 
तर ती आपली संस्कृती आणि अभिमान आहे
हा वारसा असाच जपूया
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!"
 
"विराजते जिच्या मुखी सरस्वतीची वीणा, 
अशी ही मराठी भाषा आमचा खरा दागिना
मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!"
 
"धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
 
"मराठी भाषेचा सन्मान करणे 
हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे
आजच्या खास दिवशी 
मराठी असल्याचा सार्थ अभिमान बाळगूया!"
 
"मराठी मनाचा मान आणि महाराष्ट्राची शान, 
आपली मायबोली मराठी
कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!"
 
"गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 
आणि सार्थ अभिमान आहे माझ्या मायबोलीचा
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा!"
 
"शब्दांच्या पलीकडची माया, 
विचारांची थोरवी आणि संस्कृतीचा ठेवा 
म्हणजे आपली मराठी भाषा
मराठी भाषा गौरव दिन चिरायू होवो!"
 
"ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस अभिवादन 
आणि सर्व मराठी प्रेमींना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!"
 
"अमृताहूनी गोड अशी ही आपली मराठी भाषा, 
जिच्या शब्दांतून जपली जाते आपली परंपरा
सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा!"
 
"मराठी बोलूया, 
मराठी लिहूया 
आणि आपल्या मायबोलीचा झेंडा 
जगभरात फडकवूया
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन!"