1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. National Flag Adoption Day 2026

National Flag Adoption Day 2026 : 22 जुलै 'राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिन'

भारतात दरवर्षी २२ जुलै हा दिवस 'राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी, म्हणजेच २२ जुलै १९४७ रोजी भारताच्या घटना समितीने 'तिरंगा' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता.
 
राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास आणि महत्त्व
ध्वजाची रचना : आपल्या त्रिरंगी राष्ट्रीय ध्वजाची मूळ रचना तेलंगणाचे महान स्वातंत्र्यसेनानी पिंगली वेंकय्या यांनी तयार केली होती.
 
रंगांचा अर्थ:
केशरी : शौर्य, त्याग आणि साहसाचे प्रतीक.
पांढरा : शांतता, सत्य आणि पवित्रतेचे प्रतीक.
हिरवा : समृद्धी, विश्वास आणि निसर्गाचे प्रतीक.
 
अशोक चक्र: मध्यभागी असणारे २४ आऱ्यांचे निळ्या रंगाचे अशोक चक्र हे धर्म, गती आणि प्रगतीचे प्रतीक आहे.
 
ध्वजाशी संबंधित महत्त्वाचे नियम :
आकारमान: राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर नेहमी ३:२ असायला हवे.
मान आणि सन्मान: ध्वज कधीही जमिनीला टेकणार नाही किंवा पाण्यात बुडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. फाटलेला किंवा मळलेला ध्वज फडकवला जात नाही.
स्थान: राष्ट्रध्वज फडकवताना नेहमी केशरी रंग सर्वात वर असावा.
आपल्या देशाची शान, सन्मान आणि स्वाभिमान असलेल्या 'राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनाच्या' सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 
॥ भारत माता की जय ॥

Edited By- Dhanashri Naik