संबंधित माहिती
- अभ्यास करताना झोप येते, मग हे उपाय करा
- व्यवस्थित आणि शांत झोप येण्यासाठी हे करा
- कोरोना लॉकडाऊन : 'मोबाईलच्या नादानं मुलांचं घरात लक्षच नसतं, रात्रभर झोपतच नाहीत'
- अशी आहे कोरोना रूग्णांची वर्गवारी, ९०% रुग्ण रहिवाशी इमारतींमध्ये तर फक्त १०% रुग्ण झोपडपट्टीतले
- झोप येत नाही, मग या मंत्राचा १०८ वेळा जप करा.....
"जागतीक निद्रा दिनाच्या शुभेच्छा"!
झोप ...आहाहा एक स्वर्गीय आंनद,
किडा मुंगी पासून सर्वांना परमानंद,
एका सुखद प्रवासाचा अनुभव सुंदर,
एक छानसं स्वप्न अलगद पापण्यांवर,
पैश्याने मिळत नसे झोपेचं सुख महान,
पापण्या मिटता क्षणी,यायला च हवी छान,
न कोणती चिंता, न कोणते संकट,
गाढ निद्रेत प्रत्येक कोडी सुटतात पटापट,
सुखी जीवनाचा मूलमंत्र हाच असावा,
गाढ निद्रेचा अनमोल ठेवा प्रत्येकाला मिळावा!
"जागतीक निद्रा दिनाच्या शुभेच्छा"!
अश्विनी थत्ते.
