GT vs RR : दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने
आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसमोर उभे ठाकतील. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. दिग्गज भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी यापूर्वीच हा सामना कोणता संघ जिंकेल हे उघड केले आहे.
आयपीएल २०२६ चा दुसरा क्वालिफायर सामना आज, शुक्रवार, २९ मे रोजी न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, जिथे त्यांचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाशी होईल. पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होईल. या महत्त्वपूर्ण सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Dhanashri Naik
