1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Sanju Samson appointed as Kerala T20 captain

संजू सॅमसनची टी-२० कर्णधारपदी नियुक्ती, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळचे नेतृत्व करणार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी लवकरच सुरू होणार आहे. स्टार फलंदाज संजू सॅमसनवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याची केरळ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

संजू सॅमसनची केरळ टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळला यशाकडे नेण्याची जबाबदारी आता संजूच्या खांद्यावर आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या देशांतर्गत स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज आहे. जवळपास सर्व संघांची निवड झाली आहे.
संजू सॅमसन शेवटचा केरळकडून यावर्षी जानेवारीमध्ये खेळला होता. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुदुचेरीविरुद्धच्या सामन्यात भाग घेतला होता. आता, तो पहिल्यांदाच केरळचे कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे. त्याच्याकडे १८ सदस्यीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. केरळचा पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध आहे. हा सामना मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. या दोन्ही संघांना गट 'क' मध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, आसाम, पुदुचेरी आणि त्रिपुरा हे संघही गट 'क' मध्ये आहे.
पुढील लेख
'मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर विमानसेवा हलवली जाणार नाही', मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला लिहले पत्र