प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेचा परस्पर संमतीने घटस्फोट
प्रसिद्ध गायक,राष्ट्रीय पुरस्कार विजेता राहुल देशपांड यांनी त्याच्या गाण्यानं, सुरेल आवाजानं श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. राहुल देशपांडे यांनी वैवाहिक आयुष्याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्या समोर जाहीर केला. लग्नाला तब्बल 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राहुल आणि नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
राहुल देशपांडे यांनी स्वतः ही माहिती इंस्टाग्रामवरून शेअर केली. ते म्हणाले 17 वर्षाच्या वैवाहिक संसारानंतर मी आणि नेहाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे कायदेशीर विलीगीकरण सप्टेंबर 2024 मध्ये पूर्ण झाले.
राहुल देशपांडे यांनी लिहिले
तुम्हा प्रत्येकाने माझ्या प्रवासात आपल्या आपल्या पद्धतीने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाची अपडेट शेअर करायची आहे. तुमच्यापैकी काहींना मी हे आधीच शेअर केले आहे. लग्न होऊन 17 वर्षे झाल्यानंतर आणि असंख्य गोड आठवणींनंतर, नेहा आणि मी परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आपले जीवन जगत आहोत. सप्टेंबर 2024 मध्ये आमचे कायदेशीर विभक्त होणे शांततेत आणि परस्पर समजुतीने पूर्ण झाले.
शेअर करण्याआधी मला थोडा वेळ घ्यावा असे वाटले, जेणेकरून हा बदल मी खासगीपणे स्वीकारू शकेन आणि सर्व काही काळजीपूर्वक हाताळले जाईल. विशेषतः आमची मुलगी रेनुकाच्या सर्वोत्तम हितासाठी. तिचं माझं सर्वोच्च प्राधान्य आहे. माझी मुलगी रेनुका हिच्यासाठी मी नेहमी नेहासोबत प्रेम, साथ आणि स्थैर्याने सहपालन करण्यास वचनबद्ध आहे. ही आमच्यासाठी स्वतंत्र व्यक्ती म्हणून एका नव्या अध्यायाची सुरुवात असली तरी, पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम मजबूत राहील. या काळात आमच्या निर्णयाचा आणि गोपनीयतेचा सन्मान केल्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे.
प्रेम आणि कृतज्ञतेसह,
राहुल
जवळपास वर्षभर हा विषय खासगी ठेवून, राहुल देशपांडेंनी नुकताच तो सर्वांशी शेअर केला. या बातमीमुळे राहुल देशपांडे यांच्या चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल आणि नेहा यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नेहा देशपांडे या देखील गायिका असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. विभक्त झाल्यानंतरही राहुल आपल्या मुलगी रेणुकासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहतात.
Edited By - Priya Dixit