1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. Today's Gold and Silver Rates

सोने-चांदीचे आजचे दर: खरेदीपूर्वी २२ आणि २४ कॅरेट भाव तपासा

सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी (१२ ऑक्टोबर) देशांतर्गत बाजारात या दोन्ही धातूंच्या दरांमध्ये घट झाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर वाढले आहेत. चला तर मग, आजचे ताजे दर जाणून घेऊया.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात दरांमध्ये वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात (Comex) सोने आणि चांदी या दोन्हीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. हे वृत्त लिहित असताना, 'कॉमेक्स'वर सोन्याचे दर ०.२४ टक्क्यांनी वाढून ४,२२६.४० डॉलर्स प्रति औंस (ounce) झाले होते. त्याच वेळी, चांदीचे दर ०.३७ टक्क्यांनी वाढून ६१.२७५ डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करत होते.
 
MCX वर सोन्याचा व्यवहार कोणत्या दराने होत आहे?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचे दर ८०० रुपयांनी घसरून १,५०,७०६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आले आहेत. चांदीचे दर ५०० रुपयांनी घसरून २,२५,२७० रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.
 
खरेदी करण्यापूर्वी दर तपासा
आज बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली. सध्या, २४-कॅरेट सोन्याचा व्यवहार १,५१,२७० रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास होत आहे, तर २२-कॅरेट सोने १,३९,०७७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास आहे. १८-कॅरेट सोन्याचा व्यवहार १,१३,७९० रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळ होत आहे. बुलियन मार्केटमध्ये चांदीचा व्यवहार साधारणपणे २,२६,१४० रुपये प्रति किलोग्रॅम दराने होत आहे.
 
महत्त्वाच्या टिप्स
वर दिलेले दर अंदाजित व विना-जीएसटी (GST) आहेत. प्रत्यक्ष खरेदी करताना यामध्ये ३% जीएसटी, घडणावळ आणि इतर करांची जोडणी होऊ शकते.
 
दागिने खरेदी करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक सुवर्णकाराकडून किंवा आजच्या बुलियन अपडेट्सवरून अचूक आणि अंतिम दर तपासून घ्या. 
पुढील लेख
मुंबईसह महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये वाढता उकाडा; हवामानाबाबत ताजे अपडेट