1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
  4. Learn the 5 benefits of applying henna on the head

डोक्यात मेंदी लावण्याचे 5 फायदे जाणून घ्या

हातावर लागणारी मेंदी सौंदर्य वाढविण्याचे काम करते. जर आपण केसांच्या समस्येने त्रस्त आहात तर आपले सर्व त्रास नाहीसे होतील.मेहंदी एक नैसर्गिक कंडीशनर म्हणून कार्य करते, ज्यामुळे आपले केस केवळ रेशमीच होत नाही तर केसांची वाढ देखील होते.चला जाणून घेऊ या डोक्याला मेंदी लावण्याचे फायदे. 
 
1. मेंदीमध्ये दही, आवळा पावडर, मेथीची पूड मिसळून घोळ तयार करुन केसांना लावा. 1 ते 2 तास केसांवर हे घोळ ठेवल्यानंतर केस धुवा. असं केल्याने केस काळे, घनदाट आणि चमकदार होतील.
 
2 मेहंदी वापरल्याने केस लांब होतात. त्यात मेथीदाणे  मिसळून लावल्यावर त्याचे फायदे पटकन दिसून येतात.
 
3 केसांना कंडीशनिंग करण्यात मेंदी खूप महत्वाची भूमिका बजावते. सतत याचा  वापर केल्यामुळे केस घनदाट आणि मजबूत बनतात. हे आपल्या केसांचे कोरडे क्युटिकल्स मऊ बनवते, तसेच त्यांना चमक देते.
 
4 मेंदी मध्ये दही घालून त्यात लिंबाचा रस मिसळल्यास केसांना लावल्याने केसात कोंडा होण्याची समस्या दूर होते.
 
5 केसांना लांब आणि घनदाट करायचे असल्यास मेंदीमध्ये चहापत्ती मिसळून रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी लावून घ्या. याचा वापर आठवड्यातून एकदा करू शकता.