1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. कृषीविश्व
  4. Broccoli Cultivation Information

ब्रोकोली लागवड माहिती: सुधारित वाण, खत व्यवस्थापन व उत्पादन

ब्रोकोली ही फ्लॉवर वर्गातील एक उच्च पोषकमूल्य असलेली आणि बाजारात मोठी मागणी असलेली भाजी आहे. भारतामध्ये प्रामुख्याने थंड हवामानात (ऑक्टोबर ते मार्च) याची यशस्वी लागवड केली जाते.
लागवडीच्या महत्त्वाच्या अटी
हवामानथंड हवामान (१५°C ते २५°C तापमान)
जमीनचांगल्या निचऱ्याची मध्यम ते भारी जमीन (सामू ६.० ते ६.५)
सुधारित वाण रोयल ग्रीन, फिएस्टा, लकी, ग्रीन मॅजिक
बियाण्यांचे प्रमाण३०० ते ४०० ग्रॅम प्रति हेक्टर
लागवडीचे अंतरओळींत ६० सेमी आणि रोपांमध्ये ४५ सेमी
 
रोपवाटिका व्यवस्थापन :
रोपे २५ ते ३० दिवसांत तयार होतात.गादीवाफ्यावर बियाणे पेरून रोपे तयार करा. रोपांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी ५०% शेडनेटचा वापर करावा.
 
जमीन तयारी व खत व्यवस्थापन
जमिनीची सेंद्रिय ताकद वाढवा. शेताची २-३ वेळा उभी-आडवी नांगरणी करून २-३ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळा. वाफे किंवा सर्या तयार करताना १५०:८०:८० किलो NPK प्रति हेक्टरी प्रमाणात रासायनिक खते द्या.
 
पुनर्लागवड  
संध्याकाळच्या वेळी लागवड करणे योग्य. ४ ते ५ पाने आलेली (२५-३० दिवसांची) रोपे तयार केलेल्या वाफ्यावर ठरवलेल्या अंतरावर लावावीत. पुनर्लागवडीनंतर लगेचच हलके पाणी द्यावे.
 
पाणी व आंतरमशागत
ठिबक सिंचन अत्यंत प्रभावी ठरते. जमिनीच्या प्रकारानुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकात तण होणार नाही याची काळजी घ्या आणि गरजेनुसार १-२ वेळा खुरपणी करून रोपांना मातीची जोड द्या.
काढणी व उत्पादन
पुनर्लागवडीनंतर ६० ते ८० दिवसांत पीक तयार. ब्रोकोलीचे गड्डे पूर्ण घट्ट असताना आणि पिवळे पडण्यापूर्वी धारदार चाकूने कापून घ्यावेत. प्रति हेक्टरी १२ ते १५ टन उत्पादन मिळते.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
पुरामुळे जखमी झालेल्या 'जॉयमोती' हत्तीणीला वनतारा येथे हवाई मार्गाने हलवण्यात आले