Maharashatra Day आधारस्तंभ आम्हीच, हे काम अभिमानाचे!  
					
										
                                       
                  
                  				  दिसभर घाम गाळून, मिळते मज भाकर,
	विटा मातीने घर बांधून देतो, मी चाकर,
				  													
						
																							
									  
	वर असते आभाळ माझ्या छताला ,
	अन धोंडा नेहमीच असतो मम उष्याला,
	पर मिळे शांती, दिवसभर मज राबूनी,
				  				  
	चिंता न कसली, न काळजी मना लागूंनी,
	आमच्या वीण काम अधुरे साऱ्यांचे,
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	आधारस्तंभ आम्हीच, हे काम अभिमानाचे!
	जादूची कांडी च जणू आमचे हाती  असते,
				  																								
											
									  
	स्वप्न लोकांचे पूर्ण करणे, हेच आमचे ध्येय असते.
	...अश्विनी थत्ते.