शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: गुरूवार, 12 फेब्रुवारी 2026 (07:30 IST)

Mahadev Temples in Maharashtra महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर जागृत मंदिरांचे घ्या दर्शन

mahadev
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात महादेवाची अनेक प्राचीन आणि जागृत मंदिरे आहे विशेष म्हणजे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ ज्योतिर्लिंगे एकट्या महाराष्ट्रात आहे. तसेच महाशिवरात्रीच्या या खास पवित्र पर्वावर तुम्ही नक्कीच भोलेनाथांच्या या जागृत मंदिरांना भेट देऊन भोलेनाथांचे आशीर्वाद घेऊ शकतात. आज आपण महाराष्ट्रातील काही अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध महादेव मंदिरे पाहणार आहोत जिथे नक्कीच भेट देता येईल. 
 

पाच ज्योतिर्लिंगे

त्र्यंबकेश्वर (नाशिक): हे ज्योतिर्लिंग गोदावरी नदीच्या उगमस्थानी आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचे प्रतीक असलेली तीन लहान लिंगे एकाच पिंडीत आहे.
घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर): वेरूळ लेण्यांजवळ असलेले हे बारावे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर अतिशय सुंदर असून भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र आहे.
 
भीमाशंकर (पुणे): सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेले हे मंदिर भीमा नदीचे उगमस्थान आहे. हे 'डाकिनी' क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.
 
परळी वैजनाथ (बीड): वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर डोंगरावर वसलेले असून येथे मोठी यात्रा भरते.
 
औंढा नागनाथ (हिंगोली): हे आठवे ज्योतिर्लिंग मानले जाते. या मंदिराचे स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे.
 

इतर महत्त्वाची आणि जागृत मंदिरे

शिखर शिंगणापूर (सातारा): 'दक्षिणेचे कैलास' म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर महादेव आणि पार्वती (बाळी-मुरळी) यांच्या विवाहाचे ठिकाण मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत होते.
कोल्हापूरचा कण्हेरी मठ (सिद्धगिरी): येथे महादेवाची प्राचीन पिंड असून हे आध्यात्मिक ऊर्जेचे मोठे केंद्र आहे.
 
अंबरनाथ शिव मंदिर (ठाणे): हे ११ व्या शतकातील अतिशय प्राचीन आणि कोरीव काम असलेले मंदिर आहे. हे मंदिर 'पांडवकालीन' असल्याचे मानले जाते.
 
हरिश्चंद्रेश्वर (अहमदनगर): हरिश्चंद्रगडावर असलेले हे मंदिर आणि त्यातील पाण्याने वेढलेले शिवलिंग अद्भूत आहे.
 
कुणकेश्वर (सिंधुदुर्ग): अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले हे 'कोकणचे काशी' म्हणून ओळखले जाते.