संबंधित माहिती
- Vastu Tips : शूज आणि चप्पल घालून या 5 ठिकाणी कधीही जाऊ नका
- रोहित शर्माचा आजपर्यंतचा क्रिकेट प्रवास तुम्हाला माहिती आहे का?
- तीरथ सिंह रावत : फाटकी जीन्स घालणारी महिला मुलांना काय संस्कार देणार?
- IndvsEng : रोहित शर्माची दीड शतकी खेळी, अजिंक्य रहाणेच्या साथीने डाव सावरला
- क्रिकेटपटू रोहित शर्मा नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक
रोहित शर्माच्या बुटांची आयपीएलमध्ये चर्चा
Twitter
चेन्नईच्या चिदम्बरम मैदानात कोलकाता विरुद्धचा सामना मुंबईने 10 धावांनी जिंकला. कर्णधार रोहित ने या सामन्यात 32 चेंडूत 43 धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या बुटावरील संदेशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात त्याच्या बुटावर निळ्या रंगाच्या पाण्यात पोहत असलेल्या कासवाचे चित्र होते. यातून प्लास्टिमुक्त समुद्र हा संदेश त्याने दिला.
बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात ही त्याने खास संदेश दिला होता. एक शिंग असलेली गेंड्याच्या प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या गेंड्याच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रोहितने घातलेल्या बुटावर एक शिंग असलेल्या गेंड्याचा फोटो होता. तसेच गेंड्यांना वाचवा, असा संदेशही त्यावर लिहिण्यात आला होता. रोहितने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली होती.The other cause thats extremely close to my heart. This one hits hard! This is a hundred percent in our control to reverse. I take my cause with me while I go out and do what I love! (1/2) pic.twitter.com/ZF5xP1zy9k
— Rohit Sharma (@ImRo45) April 14, 2021
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनराइजर्स हैदराबादसोबत आहे. हा सामना 17 एप्रिलला खेळला जाणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात काय संदेश देतो याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे.
