सोमवार, 13 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025 (15:30 IST)

Israel Hamas War: युद्धबंदी करार असताना इस्रायलचा गाझावर हल्ला, 30 जणांचा मृत्यू

Israel-Hamas
युद्धबंदी करार झाल्यानंतरही इस्रायलने गाझामध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये तीस पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी करार झाल्यापासून गाझामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
रहिवाशांनी स्फोट झाल्याचे वृत्त दिले होते. स्थानिक अल-शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सलमिया यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळपासून 30 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गाझाच्या नागरी संरक्षण विभागाने सांगितले की, उत्तर गाझाच्या अल-सब्रा भागात इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात 40 हून अधिक पॅलेस्टिनी लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले.नागरी संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आपत्कालीन कर्मचारी ढिगाऱ्याखाली पुरूष, महिला आणि मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 
Edited By - Priya Dixit