बुधवार, 8 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 (10:44 IST)

ब्राझीलचे माजी राष्ट्रपती बोल्सोनारो यांना २७ वर्षांची शिक्षा

Brazil
ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना सर्वोच्च न्यायालयाने बंडखोरीच्या प्रयत्नात दोषी ठरवत २७ वर्षे ३ महिन्यांची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्यांना संघटित गुन्हेगारीचे नेतृत्व आणि लोकशाहीविरोधी कट रचल्याबद्दल दोषी ठरवले. या निर्णयामुळे ब्राझीलच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना २०२२ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेत राहण्यासाठी बंडखोरीचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवले. न्यायालयाच्या ५ पैकी ४ न्यायाधीशांनी त्यांना पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आणि २७ वर्षे ३ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ब्राझीलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला बंडखोरीच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले आहे. सध्या ब्राझीलियामध्ये नजरकैदेत असलेले बोल्सोनारो यांनी नेहमीच हे आरोप फेटाळले आहे. त्यांना या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाकडे निर्णय प्रकाशित करण्यासाठी ६० दिवस आहे, त्यानंतर बोल्सोनारो यांचे वकील ५ दिवसांत स्पष्टीकरणासाठी अर्ज दाखल करू शकतात.
तसेच बोल्सोनारोला शिक्षा देताना न्यायालयाने काय म्हटले? बोल्सोनारो यांना शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती कार्मेन लुसिया म्हणाल्या, 'पुरावे स्पष्टपणे दर्शवितात की बोल्सोनारो यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी शक्य ते सर्व केले. 
Edited By- Dhanashri Naik