संबंधित माहिती
- 'विष्णू प्रिया' तुळशीचे रोप-सुख आणि समृद्धीचे प्रतीक; वास्तुदोष दूर करण्याची अद्भूत क्षमता
- अधिक मास पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करून दाखवा हा खास नैवेद्य
- Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट
- गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील
- गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा
Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप
संसारिक आयुष्यात महादेवाचे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळाची आदर्श प्रेरणा आहे. महादेव सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू या सर्व देवांचे प्रिय आणि पूजनीय आहेत. महादेवाचे संहारक रूप जगाचे रचनाकार आणि पालनकर्ते यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा नाश करून जगामध्ये संतुलन कायम ठेवतात.
याच कारणामुळे व्यवहारिक आयुष्यात सर्व दु:ख, कलह, दरिद्रता हे दोष दूर करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी महादेवाच्या छोट्या-छोट्या मंत्रांचा जप करावा. या मंत्रांमुळे महादेवाच्या वेगवेगळ्या रूपातील गोष्टी उजागर होतील. सोमवारी महादेवाच्या खाली दिलेल्या १२ मंत्रांचा जप केल्याने मोठे-मोठे कार्य यशस्वी होतील.
सोमवारी शिवलिंगावर दुध आणि पाण्याचा अभिषेक करा. गंध, अक्षदा, नैवैद्य दाखवून महादेवाची पूजा करा. पूजा करतांना किंवा झाल्यानंतर दिवा लाऊन आसनावर बसा आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करा. सर्वात शेवटी महादेवाची आरती करा.
ॐ महादेवाय नम:, ॐ हरये नम:, ॐ हराय नम:
ॐ महेश्वराय नम:, ॐ शंङ्कराय नम:, ॐ अम्बिकानाथाय नम:
ॐ गंगाधराय नम:, ॐ जटाधराय नम:, ॐ त्रिमूर्तये नम:
ॐ सदाशिवाय नम:, ॐ मृत्युञ्जयाय नम:, ॐ रुद्राय नम:
