संत चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा या गावी झाला. संत चोखोबांचे कुटुंब हे महार जातीचे होते.ते वऱ्हाडातील असल्याचे म्हटले जाते.संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वर यांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते. ...