संबंधित माहिती
- तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून या म्हणत अबू आझमी यांची शिवसेनेवर टीका
- 'एकतर शैक्षणिक कर्ज द्या...' 'नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या...' 'अन्यथा नक्षलवादी होऊ दाखवेन !'
- मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय यंत्रणांना काही महत्त्वाचे निर्देश 'असे'
- 'हा' दिवस महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जाणार
- उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस संघर्षात मुंबई मेट्रो-3 अनिश्चित काळासाठी रखडणार?
मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा, आता पुढे भाजप काय करणार?
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाहून सर्वच पक्षांनी समाजाला जोडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुंबईतील बहुतेक गुजराती समाज भाजपला मत देतो. शिवसेनेने आता गुजराती कार्ड खेळले आहे. 'मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा, गुजराती भाषिकांना जोडण्यासाठी शिवसेना मतदारसंघ हेमराज भाई शहा यांच्या नेतृत्वात गुजराती बांधवांना शिवसेनेत आणण्यासाठी मुंबईत 10 जानेवारी रोजी खास मेळाव्याचे आयोजन केले आहे.
शिवसेनेच्या या गुजराती पॅटर्नला भाजप काय उत्तर देणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे. 10 जानेवारी रोजी गुजराती समाज भवन, लोटस पेट्रोल पंपासमोर, ओशिवरा जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरी (पश्चिम) येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
